"या सुविधांचा लाभ नागपूर विभागाकरीता मर्यादित राहील याची नोंद घ्यावी"                                           "या सुविधांचा लाभ नागपूर विभागाकरीता मर्यादित राहील याची नोंद घ्यावी"                                           "या सुविधांचा लाभ नागपूर विभागाकरीता मर्यादित राहील याची नोंद घ्यावी"                                                         "या सुविधांचा लाभ नागपूर विभागाकरीता मर्यादित राहील याची नोंद घ्यावी"                                                         "या सुविधांचा लाभ नागपूर विभागाकरीता मर्यादित राहील याची नोंद घ्यावी"                                                         "या सुविधांचा लाभ नागपूर विभागाकरीता मर्यादित राहील याची नोंद घ्यावी"योजना

अल्पसंख्याक विभाग

अल्पसंख्याक लोकसमुहांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा सर्वसमावेशक उत्कर्षासाठी तसेच अल्पसंख्याकांच्या हक्काचे संरक्षण करणे. अल्पसंख्याकांच्या विकासाबाबत वेळोवेळी तज्ञांचे/तज्ञ संस्थांचे अभ्यासगट नेमून त्याआधारे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करणे.

योजना

आदिवासी विभाग

आदिवासी विकास विभागांतर्गत ठाणे, नाशिक, अमरावती, नागपूर येथे चार अप्पर आयुक्त्त व अप्पर आयुक्तांच्या अंतर्गत प्रकल्प अधिकारी काम करीत असून महाराष्ट्रात एकूण २९ प्रकल्प कार्यालये आहेत.प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासींच्या शैक्षणिक व आर्थिक विकासाच्या योजना राबविल्या जातात.

योजना

कृषी विभाग

शेतकऱ्यांना उपलब्ध संसाधनाचा परिपूर्ण वापर करून अधिकाधिक आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी कृषी विभाग कार्य करीत आहे. कृषी फलोत्पादन व जलसंधारण यासह व्यापारक्षम शेती, निर्यात वृद्धी व कृषी प्रक्रिया उद्योग यांना प्रोत्साहन देण्यासाठी शेतकरी तसेच शाश्वत शेती - अभिमुख योजना विभागामार्फत राबविण्यात येत आहेत.

योजना

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग

समाजातील १५ ते ४५ वयोगटातील उमेदवारांना अल्पमुदतीचे प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणे तथा त्यांच्या जिवनमानात बदल करणे, रोजगार व स्वयंरोजगाराच्या नविन संधी उपलब्ध करुन देणे, उद्योजकांना मागणी प्रमाणे कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे, रोजगार प्राप्त करण्यास इच्छुक असल्यास उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे.

योजना

ग्रंथालय विभाग

व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्व अनन्यसाधारण असे आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे उत्कृष्ट साधन म्हणून ग्रंथाची उपयोगिता सर्वश्रूत आहे. म्हणूनच बौद्धिक विकासाचे शक्तिकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणून सार्वजनिक ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे. सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना, परिरक्षण, संघटन, नियोजन आणि विकास करण्याचे काम ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आपल्या अधिनस्थ कार्यालयामार्फत करीत आहे.

योजना

जिल्हा उद्योग केंद्र

सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने जिल्हा उद्योग केंद्रा मार्फत सुधारीत बीज भांडवल योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) राबविल्या जातात.

योजना

दुग्ध विकास विभाग

दुधाचे उत्पादन करणे, त्यावर योग्य ते संस्करण करून त्याची विक्री करणे तसेच त्यापासून विविध पदार्थ बनविणे व त्यांची विक्री करणे इ. बाबींचा दुग्धव्यवसायामध्ये समावेश होतो. दुधाचे उत्पादन करणे यात दुधाळ जनावरांचे प्रजनन, खाद्य, दूध काढणे व देखभाल करणे हे ओघानेच येते.

योजना

नागपूर महानगरपालिका, नागपूर

नागपूर शहराची प्रतिमा ही ”स्वच्छ नागपूर सुंदर नागपूर“ व्हावी या दुष्टीने आपले शहर स्वच्छ व सूंदर करण्यास्तव नागपूर महानगरपालिके तर्फे स्वच्छता अभियान विविध स्वयंसेवी संस्था, शाळा, महाविद्यालय, नागरिक यांच्या सहकार्याने संपूर्ण शहरात मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे.

योजना

पशुसंवर्धन विभाग

उत्पादनशील पाळीव प्राण्यांची उत्पादनक्षमता किंवा उपयुक्तता वाढविण्याच्या ... सर्वप्रथम कुत्रा व त्यानंतर मेंढी, गाय , घोडा व डुक्कर हे प्राणी क्रमशः माणसाळविले गेले. या वेळी ... त्यामुळे ग्राहकालाही ते योग्य भावात मिळू शकते.

योजना

मत्स्यव्यवसाय विभाग

सचिव, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय (पदुम) हे सांभाळतात. क्षेत्रीय स्तरावर मा. आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग प्रमुख यांच्या मार्फत विविध योजनांचे कार्यान्वयन.

योजना

महसुल विभाग

विशेष सहाय्य योजनेंतर्गत राज्यात निराधार, अंध, दिव्यांग, शारिरीक आजाराने रोग ग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परित्यक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात.तसेच केंद्र पुरस्कृत दारिद्र्य रेषखालील वृध्द व्यक्तींकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, विधवा महिलांकरीता इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व दिव्यांग व्यक्तींसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात.

योजना

महावितरण विभाग

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (महावितरण), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) व महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित (महापारेषण) या तीन कंपन्या अस्तित्वात आल्या. यापैकी राज्यभरातील ग्राहकांपर्यंत वीज पोहचविण्याचे काम महावितरण कंपनीकडून केले जाते. या तीनही कंपन्यांमार्फत राबविले जाणारे उपक्रम व योजना यांचा अंतर्भाव.

योजना

महिला व बालविकास विभाग

अनाथ, निराधार, निराश्रीत व काळजी संरक्षणाची गरज असलेल्या महिला आणि बालकांचे व्यक्तीमत्व, सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणाकरिता विविध धोरणे आणि योजना, उपक्रमांची अंमलबजावणी करून समाजाचा उपयुक्त व नबदार घटक बणविण्या करिता महिला व बाल विकास विभाग कार्यरत आहे.

योजना

रेशीम विकास विभाग

रेशीम शेती उद्योग हा कृषीवर आधारीत , रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला व ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक स्तर उंचाविण्यासाठी मदत करणारा उद्योग आहे. तुती रेशीम मध्ये तुती रोपाची लागवड करणे,अळ्याची जोपासना करणे, अळ्या कोष बांधतात ते कोष बाजारात विक्री करून पैसे कमावणे असा हा रेशीम शेती उद्योग आहे.

योजना

समाजकल्याण विभाग

मागासवर्गीयांचे सामजिक व शैक्षणिक जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेषसहाय विभाग तसेच जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागा मार्फत वेगवेगळया योजना व उपक्रम.